Monday, May 30, 2011

1st love..

कसा आहेस हे कसं सांगू तुला???
खरं तर तू राजा माझ्या भावविश्वातला..
अजुनही आपल्या पहिल्या भेटीतच मन रमलय..
तू दिलेला गुलाबाला अजुनही मनात जपलय..!!

...पाणीदार डोळे तुझे हृदयाचा ठाव घेती,
तुझ्या त्या नजरेनेच होती घायाळ किती..
न अदमास लागे मला तुझ्या भावनांचा,
जणू नजरेतून देसी विश्वास आपल्या प्रीतिचा...

आहेस जरा बुद्धू....कधी जरा रोख ठोक,
माझ्याच मनाला लागे तुझ्या शब्दांचा धाक...
तू नसताना तुला आठवण्याचा छंद मला,
तू असताना तुला जाणण्याचा घोर जीवाला...

मला जपण्याचा किती रे तू प्रयत्न करतोस....
तुझ्या प्रत्येक वागण्यातुन तू अधिकच भावतोस..!!
तुझ्यासोबतच्या क्षणांची माझ्या मनी साठवण..
आपल्या ह्या प्रीतिची टिकेल का रे आठवण??

रुणझुणत्या पावसाचा अलवार श्रावण तू..
बरसणारया थेंबांचा मोहक असा मेघ तू..
कशी समजावू तुला शब्दातुनी माझ्या??
उदास या जीवनी....सुवासिक दरवळ तू..

येता चाहुल तुझी... मी परतुनी मागे पाहि..
तू नसल्याचा मज.... देतात श्वास ग्वाही..
तुलाही जपण्याचा मी मनापासून प्रयत्न करतेय..
अभिमान आहे मला की मी तुझ्यावर प्रेम करतेय...!!!
मी तुझ्यावर प्रेम करते...

1 comment: